Wednesday, May 19, 2021 | 01:35 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

केरळात डावे पुन्हा सत्तेत?
02-May-2021 11:36 AM

 | केरळ । 

पाचही राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होत आहे. सुरुवातीचे काही कल हाती यायले लागले आहेत.पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार याकडे संपूर्ण देशासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

 युपीए ३ तर एनडीए 10 जागांवर आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पुदुचेरीमध्ये यूपीए 3 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीए 10 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

अभिनेते कमल हसन आघाडीवर

दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आघाडीवर आहेत. द्रमुक पक्ष 133 तर अण्णा द्रमुक 100 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय. तामिळनाडूमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूची निवडणूक पहिल्यांदाचा करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय पार पडली आहे. द्रमुकला तब्बल 10 वर्षानंतर सत्ता मिळवण्याची संधी आहे.

पुदुचेरीमध्ये काँग्रेसची 1 आणि भाजपची 2 जागांवर आघाडी

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पुदुचेरीमध्ये भाजप 2 जागेवर तर काँग्रेस 1 जागांवर आघाडीवर आहे. तर, ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

तामिळनाडूमधील 184 जागांचे कल जाहीर , द्रमुक 86 जागांवर आघाडीवर

दक्षिणेकडील महत्वाचं राज्य तामिळनाडूचे कल निवडणूक आयोगानं जाहीर केले आहेत. 184 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 86 तर सत्ताधारी अण्णा द्रमुक 72 जागेवर आघाडीवर आहे. भाजप 3 जागांवर तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top