नवी दिल्ली 

देशाच्या 8 राज्यातील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4 जागा आहेत, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2, मणिपूर, मिझोराम आणि मेघालय मध्ये प्रत्येकी एक जागा आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 18 जागांवरील निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर सर्व जागांवरील निवडणूक आज होत आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे.

प्रत्येक मतदाराची (आमदार) तपासणी केली जाईल. ताप असलेल्या किंवा इतर लक्षणे दाखवणार्‍यांना स्वतंत्र वेटिंग रूममध्ये ठेवले जाईल. आज संध्याकाळीच सर्व जागांसाठीची मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.