नवी दिल्ली 

केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या 13 कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केलं आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांनी शुक्रवारी देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांशी व्डीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी त्यांनी टिकास्त्र सोडले

छंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचं पॅकेज जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत आपल्या विरोधी पक्षांसोबत केली पाहिजे असं या सरकारला वाटलं नाही. यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. तसंच या पॅकेजमध्ये शेतकरी, स्थलांतरित मजूर, लघु आणि मध्यम उद्योजक आणि गरीबांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यातल्या तरतुदीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चार दिवस पत्रकार परिषदही घेतली. मात्र हे सगळं पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे अशी टीका आता सोनिया गांधी यांनी केली आहे.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!