नवी दिल्ली,

 आठ खासदारांच्या निलंबनामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ गोंधळी खासदारांचं निलंबन केलं. त्यामुळेच संतप्त झालेल्या विरोधी बाकांवरच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं.

 कृषी विधेयकांवरुन रविवारी राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. विरोधकांची घोषणाबाजी आणि प्रचंड गदारोळात आवाजी मतदान घेऊन आवाजी मतदान घेऊन कृषी विधेयकं मंजूर झाली. राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांनी वेलमध्ये उतरून केलेली घोषणाबाजी आणि नियमपुस्तिका फाडण्याचा प्रयत्न याची गंभीर दखल घेऊन राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली. याच कारवाई विरोधात आक्रमक होत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त