नवी दिल्ली,

 कृषी विधेयकाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी संसद क्षेत्रात निषेध करत मोर्चा काढला. या वेळी मशेतकरी वाचवा, मजुरांना वाचवा, लोकशाही वाचवाफ अशा घोषणा देण्यात आल्या. सर्वांच्या हातात पोस्टर होते. यापूर्वी विरोधकांनी राज्यसभेच्या कामकाजावर सलग तिसर्या दिवशी बहिष्कार घातला.

 विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांना पत्र लिहून विरोधकांच्या अनुपस्थितीत सभागृहात कामगारांशी संबंधित तीन विधेयके मंजूर करु नका अशी विनंती केली. दरम्यान, तीनही विधेयके सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाली. मंगळवारी लोकसभेत ही विधेयके मंजूर झाली होती.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त