नवी दिल्ली 

 विरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक संसदेच्या उर्वरित अधिवेशनात सहभाग घेणार नाहीत. कृषी विधेयकावरून झालेल्या खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध म्हणून विरोधकांनी ही भूमिका घेतली आहे.

 काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं की, शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत. खासदारांच्या बहिष्कारानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते. यापूर्वी लोकसभेत शेतकर्यांच्या मुद्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी व इतर काही विरोधी पक्षांच्या खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुमारे 150 मिनिट स्थगित करण्यात आले होते.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त