Wednesday, May 19, 2021 | 02:27 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ममताराज येणार? पश्चिम बंगालच्या वाघिणीची मोदींना धडकी!
02-May-2021 11:47 AM

|पश्चिम बंगाल |

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्या काँटे की टक्कर दिसत होती. दोन्ही पक्षांनी शंभरपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, गेल्या तासाभरात हे चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. भाजपची गाडी 115 जागांवर अडली होती, त्यानंतर आता भाजपच्या जागा 97 पर्यंत कमी झाल्या आहेत. तर तृणमूल काँग्रेस 187 जागांवर आघाडीवर आहे. ही आघाडी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार, हे तुर्तास तरी दिसत आहे.

ट्रेंड बदलला, भाजप 100 च्या खाली, TMC 186 जागांवर आघाडीवर

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल  रविवारी जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या.

विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी 148 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top