Saturday, March 06, 2021 | 01:25 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

बजेट 2021- 'आरोग्य' सुधारणार
01-Feb-2021 04:25 PM

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी 64180 कोटींची घोषणा केली. पुढील सहा वर्षात आरोग्य सेवेचा टप्याटप्यात दर्जा सुधारला जाणार आहे.

प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने सहा वर्षांची योजना तयार केली आहे, असे सीतारामन यांनी आज सांगितले. त्या म्हणाल्या की नॅशनल हेल्थ मिशनला यामुळे फायदा होईल. या योजनेत ग्रामीण भारतात 17000 आणि शहरी आणि निमशहरी भागात 11000 नवीन आरोग्य सेवा केंद्र उभारली जातील.

आरोग्य सेवा केंद्र आणि लॅब यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारन्ह्यात येईल, असे त्यांनी सांगितले. देशात सध्या दोन करोना प्रतिबंधात्मक लसीना मान्यता मिळाली आहे. लवकरच आणखी दोन करोना प्रतिबंधात्मक लस तयार होतील, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top