गांधीनगर  

गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते, कायदा आणि शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा यांना हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. ढोलका विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवैध असल्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत. 2017 मध्ये भूपेंद्रसिंग चुडासमा विजयी झाले होते.

भूपेंद्रसिंग चुडासामा 2017 च्या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून अवघ्या 327 मतांच्या फरकाने निवडून आले होते. या निकालाला काँग्रेसचे पराभूत उमेदवार अश्‍विन राठोड यांनी आव्हान दिले होते. मतमोजणीत फेरफार केल्याचा आरोप राठोड यांनी केला होता.

429 बॅलेट मतांकडे दुर्लक्ष करुन फेरफार केल्याचा दावा काँग्रेस उमेदवार अश्‍विन राठोड यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ढोलकाचे अधिकारी धवल जानी यांची कोर्टाच्या आदेशाने बदली झाली होती.

भूपेंद्रसिंग चुडासामा यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस नेते भरत सोलंकी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!