Friday, March 05, 2021 | 06:59 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मी त्या सुदैवी लोकांपैंकी आहे, जो पाकिस्तानात गेला नाही
09-Feb-2021 02:58 PM

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण होतोय. याच निमित्तानं मंगळवारी वरीष्ठ सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत इतर दलाच्या नेत्यांनीही गुलाम नबी आझाद यांच्या आजवरच्या कामाची उजळणी करत त्यांचं कौतुक केलं तसंच भविष्यासाठी अनेक शुभेच्छाही दिल्या. यानंतर गुलाम नबी आझाद यांनीही सर्वांचे आभार मानत आपल्या दीर्घ राजकीय अनुभवातील काही प्रसंग सदनात कथन केले. राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांना निरोप, कौतुक करताना मोदींना अश्रू अनावर झाले. 

जम्मू-काश्मीर भागातून येणार्‍या गुलाम नबी आझाद यांनी आपल्याला देशभक्तीची शिकवण महात्मा गांधी, जवाहर लाल नेहरू आणि मौलाना आझाद यांना वाचून मिळाल्याचं सांगितलं. सोबतच, आझाद यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचेही आभार मानले. त्यांच्यामुळेच आपण इथवर पोहचू शकलो, असंही आझाद यांनी म्हटलं.

काश्मीरच्या सद्य परिस्थितीवरही गुलाम नबी आझाद यांनी भाष्य केलं. सोबतच पाकिस्तानसंबंधीही आपलं मत व्यक्त केलं. ममी काश्मीरच्या सर्वात मोठ्या एसपी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं. तिथे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट दोन्ही दिवस साजरे केले जात होते. 14 ऑगस्ट (पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन) साजरा करणार्‍यांची संख्या अधिक होती. मी आणि माझे काही मित्र 15 ऑगस्ट साजरा करत होतो परंतु, असे लोक खूपच कमी होते. परंतु, त्यानंतर मात्र पुढचा आठवडाभर आम्ही महाविद्यालयात जात नसू. कारण तिथे मारहाणीची शक्यता होती. त्यावेळेतून पुढे वाटचाल करत आपण आत्ता इथवर येऊन पोहचलो आहोतफ असं गुलाम नबी यांनी म्हटलं.

राज्यसभेत गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. मी त्या सुर्दैवी लोकांपैंकी आहे जो कधीही पाकिस्तानात गेले नाही. परंतु, जेव्हाही मी पाकिस्तानच्या परिस्थितीबद्दल वाचतो, तेव्हा मला गर्व होतो की आम्ही हिंदुस्तानी मुस्लीम आहोत. जगात जर कोणत्या मुस्लिमांचा गौरव करायचा असेल तर तो हिंदुस्तानी मुस्लिमांचा व्हायला हवाफ असं गुलाम नबी यांनी संसदेत म्हटलं.

गेल्या 30-35 वर्षांत अफगानिस्तानपासून ते इराकपर्यंत, काही वर्षांअगोदरच्या घटनांवर लक्ष टाकलं तर मुस्लीम देश एकमेकांत लढाया करत संपुष्टात येताना दिसत आहेत. तिथे कुणी हिंदू किंवा ख्रिश्‍चन नाहीत, ते आपांपसांतच लढत आहेत. पाकिस्तानातील समाजात ज्या कुप्रथा आहेत त्या आपल्या मुस्लिमांमध्ये कधीही येऊ नयेत, असंही गुलाम नबी यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top