अलिबाग । शहर प्रतिनिधी
शेकापचे माजी आमदार हरिभाऊ बरकुले यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. बरकुले हे १९७२ मध्ये परतूर मंठा मतदार संघाचे आमदार होते. परतूर तालुक्यातील खांडवी हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांनी राजकीय कार्यकाळात विविध पदे भूषवली. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि स्पष्टोक्ती यामुळे लोकांवर प्रभाव पाडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. शेतकरी कामगार पक्षातर्फे दिवंगत हरिभाऊ बरकुले यांना भावपूर्ण आदरांजली!