Tuesday, April 13, 2021 | 01:27 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळले ईव्हीएम
02-Apr-2021 08:08 PM

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

बंगाल आणि आसाममध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदान पार पाडल्यानंतर एका बोलेरो गाडीमध्ये ईव्हीएम मशीन सापडले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ईव्हीएम मशीन घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने चार अधिकार्‍यांना निलंबित करण्यात केले आहे. 

या घटनेनंतर निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकार्‍यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. जप्त केलेले ईव्हीएम मशीन सीलबंद होते. तरीही एलएसी 1 रतबाडी (एससी) इंदिर एम.वी स्कूलमध्ये पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संध्याकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसह ईव्हीएम मशीनसह अधिकारी मतदानस्थळाहून निघाले होते. पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार आहे. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकार्‍यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजप उमेदवाराची असल्याचे कळाले, असे आयोगाने सांगितले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top