Wednesday, May 19, 2021 | 01:29 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अफवांवर विश्‍वास ठेवू नका
25-Apr-2021 06:56 PM

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या 76 व्या कार्यक्रमात रविवारी देशवासियांना संबोधित केले. यावेळी देशातील नागरिकांनी कोरोनाच्या लसीसंबंधी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना आपल्या सर्वांची दु:ख सहन करण्याची परीक्षा पाहात आहे अशा वेळी मी आपल्याशी चर्चा करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेशी यशस्वीरित्या सामना केल्यानंतर देशातील नागरिकांचा आत्मविश्‍वास वाढला होता. आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा देशाला संकटाच्या खाईत लोटले आहे.

कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी आपल्याला आता तज्ज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्याची गरज आहे. त्याला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे, तसेच राज्येही आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनाच्या संकट काळात लस ही महत्त्वाची भूमिका बजावतेय. त्यामुळे कोरोना लसीबद्दल ज्या काही अफवा पसरत आहेत त्यांना बळी पडू नका. देशातील सर्व नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top