नवी दिल्ली

भष्ट्राचाराच्या आरोपांशी संबंधीत एका प्रकरणात केंद्रीय तपास संस्था असलेल्या सीबीआयने आज काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivkumar) यांच्या घरांवर छापे टाकले. शिवकुमार यांच्या कर्नाटक, मुबई आणि इतर काही ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईनंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षाने नेहमीच बदल्याचे राजकारण केल्याचे ते म्हणाले. 

माजी मुख्यमंत्रा सिद्धरामय्या यांनी ट्विट करत हा आरोप केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'भारतीय जनता पक्ष नेहमीच बदल्याचे राजकारण करत आला आहे. तसेच हा पक्ष जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरावर नुकतेच टाकण्यात आलेले सीबीआयचे छापे ही पोटनिवडणुकीतील आमच्या तयारीवर परिणाम व्हावा या उद्देशाने टाकण्यात आले आहेत. मी याचा निषेध करतो.'

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आयकर विभागाच्या कर चोरीच्या आरोपाबाबत केलेल्या कारवाईच्या आधारे मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत होते. याच दरम्यान ईडीला काही माहिती मिळाली. ही माहिती ईडीने गेल्याच वर्षी सीबीआयकडे दिली होती. सीबीआयने आता याच माहितीच्या आधारे प्रकरण दाखल केले आहे. या आधारे डी. के शिवकुमार यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत.

आम्ही ना घाबरणार, ना झुकणार- रणदीर सुरजेवाला

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी सीबीआयच्या या कारवाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी आणि एडियुरप्पा सरकारवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या आणि केंद्र सरकारपुढे काँग्रेसचे कार्यकर्ते कधीही घाबरणार नाही, किंवा कधीही झुकणार नाही, असे सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त