Tuesday, April 13, 2021 | 12:22 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

म्यानमारमध्ये रक्तपात; 114 हून अधिकजण ठार
29-Mar-2021 07:46 PM

। म्यानमार । वृत्तसंस्था । 

म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडानंतर, शांततेत निदर्शने करणार्‍यांवर लष्कराच्या जवानांनी शनिवारी मोठी कारवाई केली. लष्कराने एका दिवसात 114 हून अधिक जणांना ठार केले आहे. त्यामुळे शनिवार हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला.

बंडखोरीनंतर देशभरातील 44 शहरांत सर्वात मोठा रक्तपात करण्यात आला. निदर्शकांच्या डोक्यावर आणि पाठीवर गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त टेलिव्हिजनने दिले आहे. असे असले तरी 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी बंडाच्या विरोधात निदर्शक यंगून, मंडाले आणि अन्य शहरांत रस्त्यावर उतरले होते.

1 फेब्रुवारीला म्यानमारच्या सैन्याने नागरी सरकार उलथून टाकले आणि राज्य सल्लागार आंग सॅन सू की यांच्यासह नागरी नेत्यांना ताब्यात घेतले.त्यासोबतच वर्षभराची आपत्कालीन स्थिती जाहीर केली. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि म्यानमारमधील यूएनच्या कार्यालयाने या हिंसाचाराविरोधात खेद व्यक्त केला आहे.

म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे की, देशभरात सैन्य दलाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारल्याचे कृत्य खरंच निंदनीय आहे, आज झालेली अनावश्यक हानी भयानक आहे.

हिंसा पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि ती त्वरित थांबवायला हवी. या हिंसाचाराला जबाबदार असणार्‍यांना याची दखल घ्यायला हवी आहे, असे युएन कार्यालयाने सांगितले आहे. म्यानमारचे विशेष दूत क्रिस्टीन श्रानेर बर्गेनर म्हणाले की, शांतता सुनिश्‍चित करणे आणि जनतेचे रक्षण करणे ही कोणत्याही सैन्यदलाची जबाबदारी असली पाहिजे, परंतु टाटमाडॉ स्वतःच्या लोकांचाच विरोध करत आहे. असे ते पुढे

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top