पाटणा,

बिहारमध्ये भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराला रविवारपासून सुरूवात केली. मोदी है तो मुमकिन है याच धर्तीवर नितीश सत्तेवर आल्यास बिहारची घोडदौड सुरूच राहील. राज्य जास्त सुरक्षित राहील, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

 ते पुढे म्हणाले, देश मोदींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. आता बिहारचे नेतृत्व नितीश कुमार यांच्या हाती सुरक्षित आहे. म्हणूनच नितीश यांना मुख्यमंत्री करण्यासाठी रालोआ एकजूट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपने दुसर्‍या टप्प्यासाठी 46 उमेदवारांची यादी देखील रविवारी जाहीर केली. तत्पूर्वी उमेदवारांच्या नावांवरून शनिवारी उशिरा रात्रीपर्यंत पंतप्रधान मोदी, नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रिय निवड समितीमधील इतर सदस्यांच्या उपस्थितीत नावे निश्‍चित झाली.

 महिलांना पाच लाख बिनव्याजी कर्ज देणार : मुख्यमंत्री नितीश कुमार प्रचार मोहिमेला सोमवारपासून सुरूवात करणार आहेत. नितीश दोन दिवस एकूण 35 विधानसभा मतदारसंघातील लोकांशी ऑनलाईन संवाद साधतील. 14 ऑक्टोबर पासून ते प्रचार सभांना मार्गदर्शन करतील. या पार्श्‍वभूमीवर रविवारी त्यांच्या हस्ते जेडीयूचे व्हिजन डॉक्यूमेंट जारी करण्यात आले. त्यास सात निश्‍चय असे नाव देण्यात आले आहे. त्यात विद्यार्थी व रोजगारावर भर दिला आहे. आम्ही महिला उद्योजकांना बिनव्याजी कर्ज देणार आहोत. या प्रकल्पावर काम सुरू आहे. 5 लाख रुपये किंवा 50 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव आहे. हे कर्ज त्यांना आत्मनिर्भर करेल.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त