Friday, March 05, 2021 | 07:26 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अरे लाज वाटली पाहिजे...
09-Feb-2021 04:58 PM

नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

शेतकर्‍यांच्या मुद्दुावरुन मंगळवारी लोकसभेत जोरदार राडा झाला. यावेळी अमोल कोल्हे यांचा पारा चांगलाच चढल्याने वातावरण तापले होते. यावेळी आपले मत मांडताना कोल्हे यांनी भाजप सरकारची लाज काढत मोदी सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर जोरदार टिका केली. 

यावेळी आक्रमक भुमिका घेत खा. अमोल कोल्हे यांनी सांगितले कि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असो कि, ब्राझीलचे..ते जेव्हा मोदींचं कौतुक करतात ते चालतं. मग विदेशी सेलिब्रिटींनी शेतकर्‍यांना समर्थन दर्शविलं तर काय बिघडलं. त्यासाठी या सरकारनं इतक तांडव करावं. अन्नदात्याच्या आंदोलनात बॅरिगेट्स लावणं, खिळे ठोकणे हे लोकशाहीचं लक्षण नाही.  सत्तेत येताना मोदी सरकारने देशाला विकणार नाही, आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न दाखवलं होतं. त्यामुळे प्रत्येक देशवासियांनी त्यांचे स्वागतच केले. मात्र ओएलएक्सचं आधुनिक तंत्र त्या स्वप्नापेक्षा जास्त प्रभावशाली झाल्याचं दिसून येत आहे. सरकारने बीपीसीएल, बीएसएनएल, सी पोर्ट आदी अनेक सरकारी कंपन्या विकल्या. त्यामुळे हे आत्मनिर्भर कि काही भांडवलदारांसोबतचे आर्थिक हितसंबंध? 

प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. हिंसाचार हा चुकिचाच. पण शेतकरी आंदोलनाची बदनामी करण्याचे कारास्थान करणं निंदनीय आहे.  सुरुवातील मोदी सरकारने या शेतकर्‍यांना पंजाबचे शेतकरी मग खालिस्तनी आणि त्यांनंतर आयटी सेल व मिडीयाच्या काही फुटिरांनी शेतकर्‍यांवर देशद्रोहीचा ठपका ठेवला.  

त्या शेतकर्‍यांचा 18 वर्षाचा जवान सियाचीनमध्ये कडाक्याच्या थंडीत देशाचे रक्षण करतोय, तर दुसरीकडे त्याचा 70 वर्षीय बाप शेतीसाठी, त्याच्या हक्कासाठी थंडीचा मारा सहन करीत दिल्लीत ठाण मांडून बसलाय. मग मोदीं जय जवान जय किसान, हे वाक्य कोणत्या तोंडाने बोलणार? 

या आंदोलनादरम्यान भाजप सरकारने शेतकर्‍यांना आंदोलनजीवी असे नाव ठेवले. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेते जे बारीकसारीक कारणांवरुन आंदोलन करतात, अशा नेत्यांना काय बोलावं हे त्यांनी शिकवलं. 

राष्ट्रपतींनी आर्य चाणक्यचे उदाहरण देत शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. मात्र त्याच आर्य चाणक्यने यांनी लिहिले आहे कि, राजाचा अहंकार, प्रजेच्या हितापेक्षा जास्त होईल, तेव्हा समजुन जा त्याचे सरकारचा अंत निश्‍चित आहे. त्यामुळे सरकारने डोळे उघडावे आणि संवेदनशीलपणे शेतकर्‍यांच्या बाजुने विचार करावा. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top