जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी लढ्याचे जनक नेल्सन मंडेला यांची कन्या झिंदझी मंडेला यांचे निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. सोमवारी सकाळी जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. झिंदझी या 2015 पासून दक्षिण आफ्रिकेतील डेन्मार्कसच्या राजदूत होत्या. मागील वर्षी त्यांची दक्षिण कोरियाच्या राजदूत म्हणूनही नियुक्त झाली होती. त्यानंतर 5 वर्षे त्या अर्जेंटिनामध्येही राजदूत आणि मॉरिशसमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या उच्चायुक्त होत्या.

1985 साली झिंदझी यांनी नेल्सन मंडेला यांना वर्णद्वेषाच्या आणि वर्णभेदाच्या क्रूर व्यवस्थेविरुद्ध केलेल्या हिंसेचा निषेध केला. तसेच नेल्सन यांना तुरुंगातून मुक्त करण्याची तयारी दर्शवली होती. दक्षिण अफ्रिकेतील साऊथ आफ्रिकन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.