Wednesday, December 02, 2020 | 11:04 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

काश्मिरमध्ये घुसखोरीसाठी बोगद्याचा वापर
21-Nov-2020 06:21 PM

श्रीनगर  

 नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या  सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणार्‍या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. हे दहशतवादी पाकिस्तानच्या शकरगड येथून सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून घुसले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि बारूद पूर्वीपासूनचं ट्रकमध्ये असल्याचा संशय आहे.

 सीमेवर असलेल्या ताराच्या कुंपणाला कोणतीही छेडछाड झाली नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून दहशतवादी घुसल्याचा विश्‍वास आहे. बोगदा बनवून दहशतवाद्यांनी सीमा ओलांडल्याची ही पहिली घटना नाही.

 गुरुवारी नगरोटाजवळ जम्मूमध्ये झालेल्या चकमकीत ठाक झालेल्या जैशच्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा होता. त्यांच्याकडून 11 एके 47 रायफल्स आणि पिस्तूलही जप्त करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकार्‍याने दिली आहे. मोठा घातपात करण्याची योजना हे दहशतवादी आखत असल्याची शक्यता आहे. हे चौघे काश्मीरकडे जाणार्‍या ट्रकमधून प्रवास करत होते. टोल प्लाझाजवळ पोलिसांनी ट्रक थांबविला आणि त्यानंतर चकमकीत हे चौघे ठार झाले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top