Saturday, March 06, 2021 | 12:35 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

अवकाळीचा द्राक्ष, कांदा, हरभरा, गहू पिकाला फटका
19-Feb-2021 04:45 PM

। लासलगाव । वृत्तसंस्था ।

 गेले दोन दिवस राज्याला अवकाळी पावसाने झोडपले असून गारपिटीसह आलेल्या पावसाने बळीराजाच्या तोंडचा घास पळवला आहे. कोकणापासून विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्वत्र पावसाने झोडपले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सलग दुसर्‍या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदा, हरभरा व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. मात्र बुधवारी संध्याकाळी राज्यात सर्वत्र अचानक वादळी वार्‍यासह कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. नाशिकमधील ओझर, निफाड आणि पिंपळगाव बसवंत या भागात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. लासलगाव, विंचूरसह परिसरात तुरळक पाऊस झाला असला तरी वादळ मोठ्या प्रमाणात असल्याने द्राक्ष आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाचा फटका कांद्यालाही बसला आहे. सध्या कांद्याला तीन ते चार हजार रुपये इतका बाजार भाव असताना आता या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान होत बाजार भाव घसरण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top