Thursday, January 21, 2021 | 12:13 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 95 लाखांच्या उंबरठ्यावर
02-Dec-2020 12:19 PM

भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 95 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील 24 तासांमध्ये 36 हजार 604 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 94 लाख 99 हजार 414 झाली आहे. तर, याच कालावधीत 501 रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता 1 लाख 38 हजार 122 झाली आहे. तर, अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 4 लाख 28 हजार 644 वर आहे. याशिवाय मागील 24 तासांमध्ये 43 हजार 62 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची देशातील एकूण संख्या आता 89 लाख 32 हजार 647 झाली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top