Monday, March 08, 2021 | 09:43 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेतकर्‍यांनी दाखविली जागा
19-Feb-2021 02:15 PM

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचं दोन ते अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. सरकार काही उद्योजकांसाठी हे कायदे करत असल्याचा आरोपही शेतकर्‍यांनी आंदोलनादरम्यान केला होता. त्याचबरोबर रिलायन्सच्या वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन शेतकर्‍यांनी केलं होतं. त्याचा परिणाम रिलायन्स जिओवर झाल्याचं ट्रायच्या  आकडेवारीतून समोर आलं आहे. रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या संख्येनं घटले आहेत.

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओलाही शेतकरी आंदोलनाची झळ बसली आहे. कंपनीच्या पंजाब व हरयाणातील ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. डिसेंबर 2020 मधील अहवाल ट्रायकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात पंजाब व हरयाणात कंपनीच्या ग्राहक संख्येत घट झाल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही राज्यात एका महिन्यातच ग्राहकाची संख्या कमी झाली आहे.कंपनीचे 18 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच ग्राहक घटले आहेत. नोव्हेंबर 2020मध्ये कंपनीच्या ग्राहकांची संख्या 1.40 कोटी इतकी होती. ती डिसेंबरअखेरपर्यंत 1.25 कोटी इतकी कमी झाली आहे. पंजाबमध्ये कंपनीच्या ग्राहक संख्येत झालेली ही 18 महिन्यातील सर्वाधिक घट आहे.हरयाणामध्येही जिओच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षणीय घटली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये कंपनीच्या ग्राहकांची संख्या 94.48 लाख इतकी होती. ती डिसेंबरअखेर 89.07 लाख इतकी झाली आहे. 2016मध्ये जिओ दूरसंचार सेवा सुरू केल्यानंतर हरयाणात कंपनीच्या ग्राहक संख्येत प्रथमच इतकी घट झाली आहे. रिलायन्सकडून डिसेंबरमध्ये निवेदन जारी केलं होतं.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top