विंडीजचा माजी फलंदाज सर एवर्टन वीक्सचे 95 व्या वर्षी निधन झाले. एवर्टन यांनी 22 व्या वर्षी 21 जानेवारी 1948 मध्ये पदार्पण केले होते. त्यांनी त्याच वर्षी सलग पाच डावांत शतक झळकावले होते. चार शतके त्यांनी भारताविरुद्ध आपल्याच धर्तीवर ठोकले. दोन शतके कोलकाता येथे काढले. 72 वर्षांनंतरही हा विक्रम आजही कायम आहे. कसोटी करिअरमध्ये त्यांनी 48 सामन्यांत 59 च्या सरासरीने 4455 धावा काढल्या. 15 शतके ठोकली. त्यांच्या नावे कसोटीत सर्वात कमी 12 डावांत 1 हजार धावा करण्याचा विक्रम आहे.

बारबाडोसकडून 152 प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी 12,010 धावा केल्या. एवर्टन सर फ्रेंक वॉरेल आणि सर क्वाइड वालकॉटसोबत प्रसिद्ध ङ्गथ्री डब्ल्यूएसफमध्ये सहभागी होते. 1950 मध्ये विंडीज संघाने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कसोटी व मालिका जिंकली होती. तिन्ही खेळाडूंचा संघात समावेश होता. दुखापतीमुळे 1958 मध्ये 33 व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्यांनी 1964 पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1979 विश्‍वचषकादरम्यान ते कॅनडा संघाचे प्रशिक्षकदेखील होते. त्यांना आयसीसीचा हॉल ऑफ फेम सदस्याचा बहुमान मिळाला आहे. सीडब्ल्यूआयचे अध्यक्ष रिकी स्केरिटने सर एवर्टन यांना श्रद्धांजली दिली. त्यांनी म्हटले, मला एवर्टनची फलंदाजी पाहण्याची संधी मिळाली नाही, मात्र त्यानंतरच्या काळात त्यांना थोडे जाणण्याची संधी निश्‍चित मिळाली.

 

अवश्य वाचा