Thursday, January 21, 2021 | 12:54 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

ईडीसह अन्य तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही...
03-Dec-2020 11:21 AM

चौकशी करणार्‍या, तसेच अटकेचे अधिकार असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्यासह इतर तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रेकॉर्डिग उपकरणे बसवावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिले.

याशिवाय, प्रत्येक पोलीस ठाणे, सर्व आगमन व निर्गमन मार्ग, मुख्य द्वार, कोठडया आणि स्वागत कक्षासह सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कुठलाही भाग कक्षेतून सुटणार नाही हे सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी निश्‍चित करावे, असे न्या. रोहिंटन नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले. मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठी देशातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली दिला होता.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top