Thursday, January 21, 2021 | 12:35 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

मराठमोळ्या शिक्षकावर कौतुकाचा वर्षाव
04-Dec-2020 09:15 PM

सोलापूर 
युनेस्को आणि लंडनस्थित ङ्गवार्की फाऊंडेशनफ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणार्‍या ङ्गग्लोबल टीचर पुरस्काराफसाठी सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड झाली. तब्बल सात कोटी रुपयांचा (एक दशलक्ष अमेरिकी डॉलर) हा पुरस्कार असून, ते मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

लंडनमधील ङ्गनॅचरल हिस्ट्री म्युझियमममध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. जगभरातील 140 देशांतील 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातून प्राथमिक फेरीसाठी पन्नास, तर अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील दहा शिक्षकांना नामांकने जाहीर झाली होती.

डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना ङ्गक्यूआर कोडफची जोड देऊन शिक्षणात ङ्गडिजिटल क्रांतीफ करण्याचा प्रयोग केला. मया प्रयोगाने केवळ महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली. तब्बल 83 देशांतील विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन माध्यमाद्वारे विज्ञान शिकवतात.फत्याचबरोबर अस्थिर राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात.

लहानपणी आई-वडिलांसह शिक्षकांकडून मिळालेले संस्कार, प्रामाणिकपणे नवनवीन शिकण्याची प्रेरणा, शिक्षक म्हणून मुलांना घडविताना वरिष्ठांनी सतत दिलेले प्रोत्साहन, यामुळे मिळालेली प्रेरणा यातूनच हा गौरव प्राप्त करू शकलो. जागतिक स्तरावर जाहीर झालेला पुरस्कार केवळ माझा नसून संपूर्ण देशाचा आहे. समस्त शिक्षकवर्गाचा हा बहुमान आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top