Saturday, March 06, 2021 | 12:34 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतिश शर्मा यांचे निधन
19-Feb-2021 05:10 PM

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतिश शर्मा यांच्या पार्थिवावर आज दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसने सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन सतीश शर्मा यांचे काही खास फोटो ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये शर्मा यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. इतकच नाही तर राहुल यांनी शर्मा यांच्या पार्थिवाला खांदाही दिला.

         सतिश शर्मा हे गांधी कुटुंबाचे खंदे समर्थक होते. राहुल गांधी यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करणार्‍या नेत्यांमध्ये शर्मा यांचं नाव आघाडीवर होतं. वयाच्या 73 व्या वर्षी कॅन्सरमुळे शर्मा यांचे गोव्यामध्ये बुधवारी निधन झालं. शर्मा हे राजीव गांधींच्या खास मित्रांपैकी एक होते.नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये शर्मा हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी 1993 ते 1996 दरम्यान हे मंत्रीपद भूषवले. तीन वेळा राज्यसभेमध्ये निवडून आलेल्या शर्मा हे गांधी कुटुंबियांचे पारंपारिक मतदारसंघ असणार्‍या रायबरेली आणि अमेठीमधून निवडून आलेले. त्याचबरोबरच त्यांनी तीन वेळा राज्यसभेमधूनही खासदारकीची जबाबदारी पार पाडली.ते पहिल्यांदा जून 1986 मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले. त्यानंतर 1991 साली राजीव गांधींचा मृत्यू झाल्यानंतर ते अमेठीमधून लोकसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोशल नेटवर्कींगवरुन शर्मा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही शर्मा यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केलीय.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top