नवी दिल्ली 

 संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना व्हायरससोबत लढत असताना, एक आशेचा किरण दिसला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी मंगळवारी घोषणा केली आहे की,  रशियाने कोरोना व्हायरसवर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केली आहे. सेच पुतीन यांनी दावा केला आहे की, ही लस जगातील पहिली यशस्वी कोरोना व्हायरसवरील वॅक्सिन असून याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. एवढचं नाहीतर पुतीन यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीलाही या लसीचा डोस देण्यात आला आहे.

  वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे वॅक्सिन मॉस्को येथील गामेल्या इंस्टीट्यूटने डेव्हलप केलं आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने वॅक्सीम यशस्वी असल्याचं सांगितलं आहे. याचसोबत व्लादिमिर पुतीन यांनी घोषणा केली की, रशिया लवकरच या वॅक्सिनचं प्रोडक्शन सुरु करणार आहे. मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनचे डोस तयार केले जाणार आहेत.

माझ्या  मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिलाही या वॅक्सिनचा डोस देण्यात आला होता. काही वेळासाठी तिला ताप आला होता. परंतु, त्यानंतर तिची प्रकृती स्थिर आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही