Thursday, January 21, 2021 | 01:45 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

कृषी कायद्यांवर स्थगिती आणा केंद्राला सर्वोच्च तंबी
11-Jan-2021 07:45 PM

। नवी दिल्ली ।  वृत्तसंस्था ।

कृषी कायद्यांना स्थगिती द्या आणि समिती नेमा असा प्रस्ताव केंद्राला न्यायालयानं दिला आहे. कृषी कायद्यांवर स्थगिती आणा नाहीतर न्यायालयीन मार्गानं तसं केलं जाईल, अशी तंबीच न्यायालयानं केंद्राला दिली.शेतकरी आंदोलनाचा आज 47 वा दिवस आहे. नवीन कृषी कायदा रद्द करण्यासह शेतकरी आंदोलनाशी संबंधित इतर मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुमारे दोन तास सुनावणी झाली. सरकारच्या वृत्तीवर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही कृषी कायद्यावर बंदी घातली नाही तर आम्ही ते थांबवू. आपण हे प्रकरण योग्यरित्या हाताळू शकले नाही. आम्हाला काही कारवाई करावी लागेल, असे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी सरकारला सांगितले.कृषी कायद्यांबाबत सुरू असलेल्या आंदोलनांवर तोडगा न काढल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला जोरदार खडसावलं. सरकारला समस्या वाढवायचीय की तोडगा काढायचाय, असा सवाल कोर्टाने केला आहे. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे यांनी शेतकर्‍यांची बाजू न्यायालयात मांडली. कृषी कायदे रद्द करण्याबाबत शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून ठोस आश्‍वासन मिळत नाही. केवळ चर्चेच्या फेर्‍या झडत आहेत. बैठकीत कोणताच तोडगा निघत नसल्याने कडाक्याच्या थंडीत शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. शेतकर्‍यांना चर्चेसाठी पुन्हा तारीख देण्यात आली आहे. आता 15 जानेवारी रोजी चर्चा होणार आहे. तारखांवर तारखा मिळत आहेत. मात्र, चर्चेत शेतकरी प्रश्‍नावर तोडगा निघत नाही.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top