नवी दिल्ली 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित आढळलेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केली. जर या दहा राज्यांनी करोनावर नियंत्रण मिळवलं तर देश ही लढाई जिंकेल. करोनाच्या केसेसचे 72 तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो, असंही ते म्हणाले. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

 देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकण्यास मिळालं. तसंच एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना करोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल, असं मोदी यावेळी म्हणाले.

पारदर्शक माहिती सादर

 पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान करोनाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत माहिती दिली. करोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शकपणे माहिती देण्यात आली आहे. करोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नाही अशी भावना आहे. परंतु पोटासाठी बाहेर पडण्याची गरजदेखील आहे. अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं.

 राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील आहोत.

अवश्य वाचा