Monday, January 18, 2021 | 03:33 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

पंतप्रधान मोदींची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
11-Jan-2021 12:27 PM

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू होणार असून, जगातील या सर्वात मोठया कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांसह करोनाविरोधी आघाडीवरील सुमारे तीन कोटी कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यांमधील करोनाची परिस्थिती व लसीकरण अभियानाची कितपत तयारी झालेली आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.लोहरी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू इत्यादी सणांच्या पाश्वभूमीवर लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्र सरकारतर्फे शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर लसीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top