नवी दिल्ली

देशात करोना महामारीचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे.

 वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाखांच्या जवळ पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 57 हजार 117 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 764 जणांचा मृत्यू झाला आहे.

 देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 95 हजार 988 इतकी झाली आहे. 50 हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 60 हजारांच्या जवळ गेली आहे. भारतात सध्या पाच लाख 65 हजार 103 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 10 लाख 94 हजार 374 जणांनी करोनावर मात केली आहे.

 

अवश्य वाचा