Tuesday, April 13, 2021 | 12:24 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोनाचा प्रकोप
03-Apr-2021 07:32 PM

 

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतात  कोरोनाच्या  दुसर्‍या लाटेचे शिखर हे एप्रिलच्या मध्यावधीत गाठले जाईल, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. त्यानंतर मे महिना अखेरीपर्यंत रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होईल असे सांगण्यात आले. कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक मणिंद्र अग्रवाल यांनी  सूत्र प्रारूपाचा पुन्हा वापर केला असून त्यांच्या अंदाजानुसार सध्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे ते एप्रिलपर्यंत शिखरावस्था गाठेल. शिखरावस्था 15 ते 20 एप्रिल दरम्यान येईल,नंतरच्या काळात ती ओसरण्यास सुरुवात होईल.मे अखेरपर्यंत मात्र कोरोनाची घसरण खूपच जास्त असेल. तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झालेली दिसेल,असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले

 नवीन निर्बंध लागू शकतात

 महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहेत.मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. जे काही निर्बंध लादले जातील याबाबत सरकार दोन दिवसानंतर निर्णय घेणार आहे.. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना कडक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. अशीच परिस्थिती वाढत राहिली तर साखळी तोडण्यासाठी दुसरा उपाय नसल्याने लॉकडाऊनचा पर्याय असल्याचे संकेत दिलेत.

 केंद्रीय सचिवांची बैठक

  देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू लागला आहे. केंद्र सरकार याबाबत सर्व राज्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कॅबिनेट सचिवांनी  सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी आणि लसीकरण अधिक तीव्र करण्याच्याबाबतीत चर्चा झाली.

 सुमारे 2 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या बैठकीत केंद्र सरकारने कोविड 19 चे प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. कॅबिनेट सेक्रेटरी म्हणाले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन केल्याशिवाय कोरोनाला रोखणं अशक्य आहे.

टाळेबंदीच्या शक्यतेने सारेच धास्तावले

राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top