काठमांडू  

नेपाळच्या नवीन नकाशाला विरोध करणार्‍या महिला खासदार सरिता गिरी यांची जनता समाजवादी पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. भारताच्या हद्दीतील लिपुलेख, लिम्पियाधुरा, कालापानी हे तिन्ही भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवून, नवीन नकाशाला संसदेत मंजुरी दिली आहे. त्यादरम्यान, खासदार गिरी यांनी नवीन नकाशाला विरोध दर्शवत घटनादुरुस्तीसाठी सचिवांकडे विधेयकाची नोंद केली होती. नेपाळ सरकारने केलेल्या दुसर्‍या घटनादुरुस्तीच्या विरोधात उचललेले हे पाऊल मागे घ्यावे, म्हणून पक्षाने दिलेला आदेश गिरी यांनी डावलला.

लिपिमियाधुरा, लिपूलेख आणि कलापानी या भागांवर दावा करण्यासाठी नेपाळकडे पुरावे नाहीत. त्यामुळे नेपाळने जुनाच नकाशा कायम ठेवावा, असा प्रस्ताव गिरी यांनी या घटनादुरुस्तीतून मांडला होता. त्यावर पक्षाचे सरचिटणीस राम सहाय प्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीने गिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची शिफारस पक्षाकडे केली होती. त्यानुसार गिरी यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. 

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!