Wednesday, May 19, 2021 | 12:51 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सोशल मिडियावर ओन्ली ममता
02-May-2021 06:23 PM

अलिबाग । वर्षा मेहता |

पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि आणि पुद्दुचेरी या  केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचा रविवारी निकाल लागला. या निवडणुकीची चर्चा सर्वत्र होतीच. परंतु सगळ्यांचं विशेष लक्ष पश्‍चिम बंगालच्या निवडणुकांकडे होते. कारण पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालवर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. निवडणूक प्रचारातही भाजपाने पूर्ण ताकद पणाला लावल्याचं दिसून आलं. निवडणुकांचे जसे कल समोर आले त्यात चित्र स्पष्ट झाले कि पश्‍चिमी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस परत सत्तेत येणार. त्यामुळे शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जीना शुभेच्छा दिल्या.

हॅशटॅग बंगाल, दीदी, इलेक्शन रिझल्ट असे विविध विविध हॅशटॅग ट्रेंड झाले. तृणमूलने केलेल्या कामगिरीवर  जबरदस्त विजय  अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ममतांचं अभिनंदन केलं आहे. जबरदस्त विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. चला आता लोकांच्या कल्याणासाठी आणि कोरोना महामारीविरुद्ध लढा देण्याचं काम एकजुटीने करू, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्यार्‍या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छाफ असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top