भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात मागील 24 तासांमध्ये 82 हजार 376 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णांची संख्या 50 लाख 9 हजार 290 इतकी झाली आहे. तर भारतात करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत 82 हजार 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 9 लाख 93 हजार 790 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 39 लाख 33 हजार 455 रुग्ण देशात करोनामुक्त झाले आहेत.दरम्यान मंगळवारी महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 20 हजार 432 करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला असला तरीही समाधानाची बाब ही आहे की आत्तापर्यंत 39 लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशातील 18 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात करोनाग्रस्तांच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 5 हजार ते 50 हजारांच्या दरम्यान आहे. फक्त चार राज्ये अशी आहेत जिथे अ‍ॅक्टिव्ह केसेस 50 हजारांपेक्षा जास्त आहे. देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आज समोर आलेल्या संख्येनुसार 2 लाख 91 हजार 797 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. भारतात सोमवारी रात्री पर्यंत करोनाच्या एकूण 49 लाख 26 हजारांपेक्षा जास्त केसेस होत्या. त्यामध्ये नव्या रुग्णांची भर पडल्याने भारताने 50 लाख संख्येचा टप्पा ओलांडला आहे.

 

अवश्य वाचा