Tuesday, April 13, 2021 | 01:11 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

देशात आजपासून आयकरचे नवे नियम
31-Mar-2021 08:17 PM

 

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

 फेब्रुवारीमध्ये मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये आयकराच्या नियमांत काही बदल करण्यात आले होते. ते बदल आता  गुरुवारी 1 एप्रिलपासून सुरु होणार्‍या नव्या आर्थिक वर्षात लागू होणार आहेत. 

  भविष्यनिधीवरही कर

 नव्या नियमामध्ये, 2.5 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त पीएफवर मिळणार्‍या व्याजावर कर द्यावा लागणार आहे. ज्यांचे पगार जास्त आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 आयकर भरायला सोपं

  नव्या नियमानुसार आता आयकर भरण्यामध्ये अधिक सुलभता येणार आहे. आयकर भरणार्‍या लोकांना  डोळ्यासमोर ठेऊन सरकारने टॅक्स रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. तसेच आयटीआर फाईल करणेही सोपं झालं आहे.

 टीडीएस दुप्पट होणार 

केंद्र सरकार आयटीआर फाईलिंग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. जे लोक आयटीआर फाईल करणार नाहीत त्यांना दुप्पट टीडीएस द्यावा लागेल आयकर कायद्यामध्ये नवीन सेक्शन 206 इ जोडले आहे. त्यानुसार आता आयटीआर फाईल न केल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. नव्या आयकर कायद्यानुसार, पीनल टीडीएस आणि टीसीएल 10 ते 20 टक्के इतके झाले आहे. ते या आधी 5-10 टक्के इतके होते. आयटीआर दाखल न करणार्‍यांसाठी टीडीएस आणि टीसीएस हा 5 टक्क्याचा दर दुप्पट होणार आहे. 

 वयोवृद्धांना टॅक्स रिटर्नचा दिलासा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 75 वर्षावरील वृद्धांना टॅक्स रिटर्नमध्ये दिलासा देणार असल्याचं सांगितलं होतं. 1 एप्रिलपासून 75 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना टॅक्स रिटर्न फाईल करण्याची गरज नाही. जे लोक पेन्शन वा फिक्स डिपॉजिटच्या व्याजावर अवलंबून आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत असणार आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top