कोल्हापूर 

दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनांसह भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही दूध दरासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारनं एक बैठक बोलावली होती. त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार, किसान संघर्ष समितीबरोबरच भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष व रयत क्रांती संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. रयत क्रांती संघटनेनं शुक्रवारी रात्रीच आष्टा-भिलवडी मार्गावर दुधाचा टँकर फोडून आक्रमक होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून दुधाचे टँकर अडवले जात आहेत, तर काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध केला जात आहे. त्यामुळं जिल्ह्या-जिल्ह्यांतील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. कोल्हापूर येथे अकरा वाजता महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

 

अवश्य वाचा