नागपूर

 जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदियाचे जवान नरेश उमराव बडोले (वय 49) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) 117 बटालियनमध्ये ते कार्यरत होते.

 गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. 24 एप्रिल 1971 रोजी जन्मलेले बडोले 1989 मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर आज सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्‍चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार आहे.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त