Saturday, March 06, 2021 | 01:51 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

लसीकरणात भारत तिसर्‍या क्रमांकावर
19-Feb-2021 02:10 PM

  । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत जागतिक स्तरावर लशीकरणाच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 94 लाखांहून अधिक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि कोरोनायोद्धयांचे लसीकरण करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.आतापर्यंत एकूण 94 लाख, 22 हजार, 228 लाभार्थ्यांना लशीची मात्रा टोचण्यात आली, त्यामध्ये 61 लाख, 96 हजार, 641 कोरोनायोद्धे (पहिली मात्रा), तीन लाख, 69 हजार, 167 कोरोनायोद्धे (दुसरी मात्रा) आणि 28 लाख, 65 हजार, 420 कोरोनायोद्धे (पहिली मात्रा) यांचा समावेश आहे.

पहिली मात्रा घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना 13 फेब्रुवारीपासून दुसरी मात्रा देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या 33 व्या दिवशी (18 फेब्रुवारी) एकूण चार लाख, 22 हजार, 998 जणांना एकूण सात हजार, 932 दोन सत्रांमध्ये लसीची मात्रा देण्यात आली आहे.देशात गेल्या एक दिवसात आणखी 12 हजार 881 जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी, नऊ लाख, 50 हजार 201 वर पोहोचली आहे. तर एक कोटी, सहा लाख, 56 हजार, 845 जण आतापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.कोरोनामुळे गेल्या 24 तासांत आणखी 101 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख, 56 हजार, 14 वर पोहोचली आहे. मृत्युदर 1.42 टक्क्यांवर आला असून बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के इतके आहे. बाधितांची एकूण संख्या 1.5 लाखांपेक्षा कमी आहे. देशात सध्या एक लाख, 37 हजार, 342 उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या 1.25 टक्के इतके आहे. गेल्या एक दिवसात 101 जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील 40 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 51 हजार, 631 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top