Thursday, December 03, 2020 | 12:50 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

देशातील कोरोनाचा वेग मंंदावतोय
27-Oct-2020 07:09 PM

नवी दिल्ली 

 सतत वाढणार्‍या कोरोना रुग्णांमुळे देशात सर्वत्र भीतीचे वातावरण होते. आता मात्र अनेक महिन्यांनंतर करोनाविरोधातील लढाईदरम्यान आशेचा किरण दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.  गेल्या 24 तासात देशात 36 हजार 604 नवे रुग्ण आढळले असून हा आकडा गेल्या तीन महिन्यांमधील सर्वात कमी आहे.

  आतापर्यंत भारतात  1 लाख 19 हजार 496 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 79 लाख 46 हजार 652 वर पोहोचली आहे.   दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रूग्ण वाढत्या संख्येच्या तुलनेत कोरोना व्हायरसवर मात करणार्‍यांची संख्या अधिक आहे. देशात सध्या 6 लाख 30 हजार 546 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 72 लाख 1 हजार 70 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top