Thursday, December 03, 2020 | 02:07 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

भारतात चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले
28-Oct-2020 10:56 AM

देशात चोवीस तासांतील कोरोनाच्या संसर्गाबाबतची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नव्या बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकूणच देशभरात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाच गेल्या चोवीस तासांत 43,893 नवे रुग्ण आढळून आले. तर 58,439 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 79,90,322 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 508 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 1,20,010 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांत 15,054 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याने देशात सध्या एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,10,803वर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top