साडेचार महिन्यांपासून देशाच्या कोरोनाविरोधातील लढयाची सूत्रे  हलविणारे केंद्रीय गृहमंत्रालयाचे प्रमुख अमित शहा यांना संसर्ग झाला आहे. त्यांना रविवारी गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संसर्ग झाल्याची माहिती शहा यांनी ट्वीट करून दिली.

कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी चाचणी करून घेतली. त्यातून मी कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात जावे आणि चाचणी करून घ्यावी, असे ट्वीट शहा यांनी केले.55 वर्षीय शहा यांना ताप किवा कोरोनाची अन्य लक्षणे नसली तरी त्यांना कालपासून थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी चाचणी केली. शहा यांना मधुमेह असल्याने त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे आवश्यक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद