Wednesday, December 02, 2020 | 12:42 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण
21-Nov-2020 04:31 PM

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राने आज आणखी एक सुपुत्र गमावला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना वीरमरण आलं आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत.

संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये 16 मराठा पोस्टवर ते नियुक्त होते. संग्राम पाटील यांच्या जाण्याने निगवे खालसा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. संग्राम पाटील यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. काही महिन्यांनी निवृत्त होऊन संग्राम पाटील गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घरी परतले नव्हते. फोनवरुनच त्यांची कुटुंबियांशी चर्चा होत होती. आज त्यांच्या जाण्याची बातमी घेऊन आलेल्या फोनने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top