नवी दिल्ली 

काश्मीरमधील सोपोर येथे बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा त्याच्यासमवेत त्याचा 3 वर्षीय नातूही होता. आजोबा दहशतवाद्यांची गोळी लागून कोसळले आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. मात्र हा 3 वर्षाचा बालक आजोबांच्या मृतदेहाजवळच बसून आक्रोश करीत होता. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्वरित या बालकाचा तेथून दूर सुरक्षित स्थळी नेले. त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला.सोपोरमध्ये सुरक्षा सैनिकांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असताना जवळच्या रस्त्याने 65 वर्षांचा हा वृद्ध व त्याचा लहानगा नातू हे चालले होते.

एका दहशतवाद्याने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. दोन गोळया लागल्याने वृद्धाने प्राण गमावला. पण बालकाला वाचविण्यात सुरक्ष दलांना यश आले. जमिनीवर मृतदेह पडला हे पाहून तो चिमुकला रडत होता. हे पाहून बाजूला दहशतवाद्यांवर निशाणा धरुन बसलेल्या भारतीय जवानाने त्या चिमुकल्याला आपल्याकडे बोलावून घेतले. आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.गोळी लागून वृद्ध गतप्राण झाल्यानंतर त्या बालकाने आजोबांच्या शेजारी बसून ङ्गआजोबा उठा नाफ असा आक्रोश चालविला होता. ते दृष्य हृदयद्रावक होते असे तेथे उपस्थित सुरक्षा सैनिकांनी सांगितले. सैनिकांपैकी एकाने त्वरित रस्त्यावर धाव घेऊन बालकाला उचलून घेतले आणि लगोलग त्याची सुरक्षितस्थळी पाठवणी करण्यात आली. या प्रसंगावधानासाठी सैनिकांचे कौतुक होत आहे.