Tuesday, April 13, 2021 | 12:53 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

आजपासून दूध,वीज,प्रवास सारं काही महाग
31-Mar-2021 08:19 PM

 

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आधीच महागाईच्या ओझ्याने वाकलेल्या,कोरोनाच्या धास्तीने ग्रासलेल्या सर्वसामान्यांला दररोजचं जीणं जगणं अवघड बनलंय.त्यात आता 1 एप्रिलपासून  सर्वांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत अनेक वस्तू महागणार आहेत. दूध, वीज आणि प्रवास सर्वकाही महाग होईल. आतापर्यंत केवळ कंपन्या महागाईन सहन करत होत्या. आता त्यांनी हा भार ग्राहकांच्या डोईवर दिलाय. महागाई कसे तुमचे खिसे कापण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांना हा भार आता न सोसण्याच्या पलिकडचा झालायं.

 कार,बाईक खरेदी महाग 

मारुती, निसानसारख्या कंपन्यांनी त्यांच्या कारची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून या कंपन्यांच्या कार महाग होतील. ही वाढ किती होणार याबाबत ऑटो कंपन्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही.  बर्‍याच दिवसांपासून  महागड्या कच्च्या मालाचा भार सोसावा लागला होता, पण आता हा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

 रेफ्रिजरेटर, एसी महाग

यावर्षी महागाईचा फटका एसी  किंवा फ्रीज खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. 1 एप्रिलपासून एसी कंपन्या किंमती वाढविण्याच्या विचारात आहेत. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे कंपन्या एसीच्या किंमतीत वाढ करण्याची तयारी करत आहेत. एसीची प्रति युनिट किंमत 1500 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढू शकते.

 टीव्ही देखील महाग

  गेल्या 8 महिन्यांत टीव्हीच्या किंमतीत 3 ते 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. टीव्ही उत्पादकांनीही पीएलआय योजनांमध्ये टीव्ही आणण्याची मागणी केली आहे. 1 एप्रिल 2021 पासून टीव्हीची किंमत कमीतकमी 2 ते 3 हजार रुपयांनी वाढेल.

 हवाई प्रवासात दरवाढ

हवाई मार्गाने प्रवास करण्यासाठी आता आपल्याला अधिक खिसा खाली करावा लागणार आहे. देशांतर्गत उड्डाणांचे किमान भाडे 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  देशांतर्गत उड्डाणांसाठी विमान वाहतूक सुरक्षा फी 200 रुपये असेल. सध्या ती 160 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी फी 5.2 डॉलरने वाढून 12 डॉलर इतकी असेल. नवीन दर 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील.

 दूध महागणार

दुधाची किंमत प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवून 49 रुपये करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून दुधाचे नवीन दर लागू होतील. मात्र, दुधाची किंमत प्रति लिटर 55 रुपये करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. पण किंमत इतकी वाढणार नाही.1 एप्रिलपासून  प्रतिलिटर दुध 49 रुपये मिळेल. अशा परिस्थितीत तूप, चीज आणि दहीसह सर्व दुधाच्या उत्पादनांची किंमत वाढू शकते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top