Thursday, January 21, 2021 | 12:06 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

8 डिसेंबरला देशव्यापी बंदची शेतकर्‍यांची हाक टोलनाकेही बंद..
04-Dec-2020 08:24 PM

नवी दिल्ली

शेतकरी आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. तसेच 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली असून, देशातील सर्व टोल बंद करणार असल्याची माहिती शेतकर्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. प्रत्येक राज्यात शेतकरी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेलं शेतकरी आंदोलन आता नवव्या दिवसात पोहचलं आहे. आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकल्यानंतर सरकारने काल दुसर्‍यांदा शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. उद्या 5 डिसेंबरला दुपारी दोन वाजता पुन्हा शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे.  सरकारने एमएसपीवर काही संकेत दिले आहेत. चर्चेतून आज गोष्टी पुढे सरकल्या आहेत. मात्र, आंदोलन सुरूच राहील. आता 5 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top