Monday, January 18, 2021 | 03:31 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

मध्य प्रदेशमध्ये विषारी दारूप्राशन केल्याने अकरा जणांचा मृत्
12-Jan-2021 03:27 PM

 । ग्वाल्हेर । वृत्तसंस्था ।

मध्य प्रदेशच्या मुरैना येथे विषारी दारू प्राशन केल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमावली, पहावली, बागचीनी अशा गावात राहणार्‍या 11 जणांना ही विषबाधा झाल्याने मृत्यू झाला.या प्रकरणात विषारी दारू प्यायल्याने 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. या सात जणांना ग्वाल्हेर येथे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातही विषारी दारूमुळे बुलंदशहर येथेही असाच प्रकार घडला. येथील तब्बल 20 जणांना अचानक विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा, या सगळ्यांनी दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं दारू प्यायल्यानंतरच त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचारांदरम्यान पाच जण मृत्युमुखी पडले होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top