नवी दिल्ली,

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने सांगितले की,  निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना आयकर विभागकडून नोटीस पाठवण्यात आल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दाखवण्यात आले. मात्र ही माहिती चुकीची आहे. भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष आयकर विभागाला नोटीस जारी करण्यासंबंधी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत  असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने आता दिले आहे.

अवश्य वाचा