Wednesday, May 19, 2021 | 01:57 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ऑक्सिजनअभावी आठ जणांचा मृत्यू
01-May-2021 07:16 PM

 

| दिल्ली | वृत्तसंस्था |

दिल्लीतील बत्रा रुग्णालयामध्ये शनिवारी ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजन साठा संपल्याने जवळपास 1 तास 20 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होऊ शकला नाही. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका डॉक्टरचादेखील समावेश आहे. ऑक्सिजन संपल्यामुळे बत्रा हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटेरोलोजी विभागाच्या विभागाध्यक्षांचादेखील मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी सात रुग्णदेखील यामुळे दगावले. अन्य पाच गंभीर रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top