Thursday, January 21, 2021 | 01:38 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद
01-Dec-2020 08:41 PM

नवी दिल्ली , मुंबई

केंद्रातील मोदी सरकारने लागू केेलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्रातही पोहोचली आहे.या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आता गुरुवारी राज्यात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.दरम्यान, शेतकरी आंदोलनाला देशभरातून वाढता  पाठिंबा मिळतोय हे लक्षात येताच केंद्राने नमते धोरण स्वीकारले आहे.मंगळवारी केंद्र सरकारने शेतकरी आंदोलकांशी चर्चा सुरु केली आहे.

राज्यात उद्या शेतकर्‍यांचा एल्गार

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

 राज्यातील आंदोलन तीव्र करण्यासाठी मंगळवारी संपन्न झालेल्या बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ.अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी संघटना व समाजसेवी संघटनांचे व्यासपीठ असलेल्या जनसंघटनांची समन्वय समितीची ऑनलाईन बैठक विश्‍वास उटगी यांच्या पुढाकाराने  संपन्न होऊन या समितीनेही 3 डिसेंबरच्या राज्यातील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

  शेतकर्‍यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिली आहे.   संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रस्ता रोको करून शेतकर्‍यांचे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

 शेतकर्‍यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आपल्या अन्नदात्यांच्या या आंदोलनात राज्यातील जनतेने प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकले

कृषी कायद्याविरोधात आपल्या मागण्यांवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. दुसरीकडे, बिनशर्त चर्चा करण्यासाठी सरकारनं तयारी दर्शवत मंगळवारी  शेतकरी संघटनांना चर्चेसाठी पाचारण केलंय.शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात चर्चेच्या फेर्‍या सुरु झाल्यात.   मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. असा निर्धार शेतकरी नेत्यांनी घेतलाय त्यामुळे पाचव्या दिवशी शेतकर्‍यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत आहे.  दिल्लीच्या टोकाला असलेल्या बुराडी निरंकारी मैदानावर  शेतकर्‍यांनी एकत्र यावे व त्यानंतर शेतकर्‍यांशी चर्चा केली जाईल, ही सरकारची अट शेतकर्‍यांनी अमान्य केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच, कृषिमंत्री नरेंद्र तोमर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी   शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सविस्तर चर्चा केली होती. अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. त्यात तोमर उपस्थित होते.दिल्लीतील दोन टॅक्सी संघटनांनीही शेतकर्‍यांना पाठिंबा दिला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top